shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊर्जा मंञी प्राजक्त तनपुरे यांनी घेतली नगर पंचायत समिती उपसभापती भापकर यांच्या पञाची दखल..!!

ऊर्जा मंञी प्राजक्त तनपुरे यांनी घेतली नगर पंचायत समिती उपसभापती भापकर यांच्या पञाची दखल..!!
नगर:- प्रतिनिधी (शिवा म्हस्के)

 नगर तालुक्यातील ग्रामीण उपविभागीय अ.नगर (नगर तालुका) रुईछत्तीसी उपकेंद्र द्वारे होणार्या शेतीवाहिनी‌ ३ फेज विद्युत पुरवठा हा दिवसा असावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी नगर पंचायत समिती चे उपसभापती रवींद्र भापकर यांच्या कडे केली होती. हि ३ फेज शेतीवाहिनी दिवसा असावी अशी मागणी शेतकरी बांधव वारंवार करत होते. यांची तातडीने दखल घेऊन उपसभापती भापकर यांनी राज्याचे उर्जा मंत्री  प्राजक्त तनपुरे यांच्या कडे लेखी पत्राद्वारे शेती विज वाहिनी वेळा पत्रक परस्थिती कळवली होती.संबधीत पत्रा ची‌ मंत्रीमहोदयांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला मागणी प्रमाणे आदेश केले. 



तर त्य आदेशाप्रमाणे  १ ऑक्टोंबर २०२० पासून  सकाळी दिवस पाळी मध्ये ३ फेज शेतीवाहिनी सोडण्याचं ‌वेळा पत्रक‌ जाहीर करण्यात आले आहे. या शेतकरी मागणी ला उपसभापती भापकर यांनी न्याय मिळवून दिला अशी भावना शेतकरी सुदाम म्हस्के, साहेबराव हिंगे, सुधीर म्हस्के, लक्ष्मण वाघ, गोरख म्हस्के, भाऊसाहेब म्हस्के, दत्तात्रय वाघमोडे, रामदास हिंगे, शिवाजी शिंदे .आदी शेतकरी बांधवांनी शिर्डी एक्स्प्रेस च्या प्रतिनिधीशी  बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
close