shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणी रस्ता देता का... रस्ता..? प्रशासनाचा दिरंगाई कारभार,शेतकरी वैतागले.?



नगर तालुका प्रतिनिधी(शिवा म्हस्के): 
नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील सांडवा फाटा ते हांडेवाडी या शिवरस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून लोकप्रतिनिधिंनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकर्या़नमधून होत आहे.


   
सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करूनही रस्ता न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्यामुळे मोठी कसरत करत या रस्त्यावरून त्यांना ये-जा करावी लागत आहे. 
याबाबत दशमिगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा ठराव करण्यात आले, माञ याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकर्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली. ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली असता संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. माञ कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने संबंधित शेतकर्यांनी तहसिलदार यांच्याकडे ग्रामपंचायतद्वारे लेखी पाठपुरावा केला माञ तहसील कार्यालयाकडूनही दखल न घेण्यात आल्याने शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत तक्रार अर्ज देउन वारंवार पाठपुरवठा करुनही दखल न घेणार्या अधिकार्यांनवर कार्यवाही व्हावी असे निवेदन दिले आहे.


याकडे जिल्हाधिकारी कितपथ लक्ष देतात यासाठी शेतकर्यांचे आता लक्ष लागून आहे.
close