shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१०,हिंगोली जिल्हयातील सेनगांव येथील बुलढाणा अर्बन को.आॅ.क्रेडिट सोसायटीचे चिफ मॅनेजिग डायरेक्टर सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनीटायझर,मास्क,वाटप व गुंतवत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक विधायक कार्यक्रम राबविण्यावर विशेष भर दिल्या जातो व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सह आर्थिक मदतही यापूर्वी करण्यात आली आहे सामाजिक कार्यात नेहमीच शाखा व्यवस्थापक नागेश मुळे हे हिरीरीने भाग घेतात.
 हिंगोलीचे विभागीय व्यवस्थापक श्री संचेती यांच्या मार्गदर्शनानुसार शाखा व्यवस्थापक नागेश मुळे यांनी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दि.१० आक्टोबर शनिवार रोजी सकाळीच वाढदिवसाचे औचित्य साधून सेनगांव येथील साई मंदिर देवस्थानात अभिषेक करण्यात आला त्यानंतर सेनगाव येथील पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनी टायझर वाटप करण्यात आले बुलढाणा को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी शाखेत भानेश्वर शाळेतून इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनी पत्रकार जगन्नाथ पुरी यांची मुलगी कु.विजया जगन्नाथ पुरी व विशेष गुणवत्ता प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी सारिका सिताराम खोंडकर या दोन्ही विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय उपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला यावेळी लेखा परिक्षक लोहिया विभागीय लेखा परिक्षक श्री मुंडे शाखा व्यवस्थापक श्री मुळे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
close