इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पंधारवाडी येथे दर्जेदार मक्याचे पीक पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकामधे जाऊन चर्चा केली.
वडापुरी नजीक पधारवाडी येथे किसनराव भगत यांच्या ७ एक कर क्षेत्र असलेल्या शेतामध्ये लावलेले मका पीक डोळे दीपण्यासारखे आल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकात प्रत्यक्ष भेटी देऊन या पिकाबद्दल रहस्य जाणून घेत असल्याचे निदर्शनास आले
वडापुरी दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी वडापुरी नजीक पंधारवाडी येथील शेतकरी किसनराव भगत व त्यांचे पुत्र विक्रम भगत यांनी जून महिन्यात मका पिकाची लागवड केली असून सदर पिक आज पंधारवाडी व काटी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नागरिकांच्या नजरेत भरेल असे असून या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे उंच एकसमान वाढलेली कणसातील दाणे दार पणा आकर्षक असा कलर दर्जेदार लांब कणीस यामुळे या शेतकऱ्याच्या पिकाची ची दखल घेऊन ज्या कंपनीचे बियाणे होते कंपनीमार्फत सदर शेतकऱ्याचे सन्मान सोहळा शासनाच्या नियमानुसार ठेवण्यात आला होता त्यावेळी शेतकरी किसनराव आप्पाजी भगत यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले की ेतकर्यांनी शेती करीत असताना शेतीमधील मशागत त्यानंतर उत्तम बियाणे योग्य ते योग्य ती खते वापरणे पाणी योग्य त्या वेळी विकास देणे वेळोवेळी अभ्यासात्मक दृष्टीने शेतीची पाहणी करून निगा राखणे इत्यादी बाबी वरून उत्तम पीक घेता कशा पद्धतीने येत असते हे त्याचे प्रत्यक्ष दर्शनी असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली तसेच ते पुढे म्हणाले की आपल्या शेतामध्ये उत्तम दर्जेदार पीक आले तरच आपली आर्थिक प्रगती होते यावेळी पंधारवाडी चे सरपंच दिगंबर निंबाळकर सुनील जगताप अनिल नलवडे घोगरे रावसाहेब गेंड रावसाहेब तानाजी नलवडे मेजर सतीश शेंबडे दसरथ जाधव सतीश भोसले डॉक्टर अमोल तोबरे व इतर मान्यवर शेतकरी यांनी उपस्थित राहून शेतकरी किसनराव भगत यांचे कौतुक केले

