shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यापाऱ्यांना सोबत घेऊन हिंगोलीचा चेहरामोहरा बदलायचा आहे-आमदार तान्हाजीराव मुटकुळे..!!

हिंगोली‌। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
 दि.१०,व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्यक्रम देऊन जिल्हा व्यापारी महासंघा च्या पाठीमागे खंबीर पणे उभा असल्याचे हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी सांगुन अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदावर अनिल नैनवाणी यांच्या  झालेल्या निवडीच्या सत्काराच्या कार्यक्रमात बोलतांना आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त केले.

  
अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे  क्रियाशील सदस्य श्री अनिल नैनवाणी यांची निवड  झाल्या बद्दल हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने  आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,बिरजू यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.येत्या काळात एमआयडीसी व मतदारसंघात मोठे  उद्योग कसे आणता येतील व उभारता येईल या बाबतीत  हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधीऱ्यां   सोबत महिन्याला एकदा तरी  बसून नियोजन  करणार असून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून हिंगोली मतदार संघाचा चेहरा मोहरा येत्या काळात बदलावयाचा आहे.हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास  त्या सोडवण्या करता पुर्ण पणे पाठीशी उभे असल्याबद्दल  त्यांनी सांगून व्यापाऱ्यांनी पण दादागीरी करणाऱ्यांचा समर्थपणे सामना करावा,सामान्य व्यापारी वा माणसांवर दादागीरी करणांरांची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवावे. मी सर्वसामान्यांचे  काम करतांना पक्षाचा असो का नको कामच करतो. व्यापाऱ्यांनी भयमुक्त वातावरणात काम करावे असे सांगुन व्यापारी महासंघाने लॉकडाउनच्या काळात व्यापाऱ्यांना साठी केलेल्या कार्या बद्दल प्रशंशा केली. याप्रसंगी न.प.चे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी अनिल  नैनवाणी ह्यांना शुभेच्छा दिल्या.आ.मुटकुळे यांच्याहस्ते अनिल नैनवाणी यांचा शाल,पुष्पहार घालुन सत्कार करून व्यापाऱ्यांचे प्रश्न राज्य पातळीवर सोडविण्याचे काम अनिल नैनवाणी हे निश्चितच करतील असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हिंगोली उद्योजक संघटने चे सचिव प्रविण सोनी ह्यांनी केले.

कार्यक्रमास नंदकिशोर तोष्णीवाल,गजेंद्र बियाणी,कैलाश काबरा, रविंद्र सोनी,प्रशांत (गोल्डी) सोनी,सुमीत चौधरी, संजय देवडा,मधूर भंसाळी,पवन मुंदडा,जगजीतराज खुराना मयूर कयाल,बाजीराव इंगोले,मज़हर अनीसभाई, बी.डी बांगर,बालू टाले,रमन काबरा,गोविन्द झंवर,अभिजीत डुब्बेवार ,देवीकांत देशमुख,,पंकज दुबे ,नागेशअप्पा सराफ,,सुमित चांडक ,गौरव अग्रवाल नरेश देशमुख  ओम नैनवानी ,श्याम  खंडेलवाल,हमीद प्यारेवाले, प्रवीण सोनी,   पवन राठी,दयाल यादव,  सागर दुबे, प्रशांत बगडीया,, दिपक लदनीया , प्रशांत मूंदड़ा, सि. ए. आमेर कुंदा, आशीष पोरवाल,अनूप अग्रवाल, भारत जगताप, दयाल यादव, हनीफभाई, पंकज वर्मा , श्याम नैनवानी,प्रितम नैनवानी सुमित नैनवानी, पंकज अग्रवाल,चंदू कोकडवार,नरसिंह पुरोहित, हनीफ भाई आदी व्यापारी उपस्थित होते.
close