shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवरा बरोबरच गणेश यंदा होणार सुरू..! दोन्हींचे बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी):
राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील साखर कारखान्याचा सन 20 --21 गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ आज 10 ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. त्या अगोदर प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा ७१वा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न झाला. राहता तालुक्यातील  दोन्ही साखर कारखान्यांचे बॉयलर आज पेटल्याने  तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील गणेश कारखाना हा प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने चालवण्यास घेतला आहे.मागील वर्षी हा कारखाना बंद होता.मात्र यावर्षी परिसरात पाऊस भरपूर झाला आहे. त्यामुळे गणेश कारखाना यावर्षी नक्की सुरू होईल अशी आशा होती व आता आज दि,१०रोजी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित गणेश सहकारी साखर कारखाना याचा सन 20-- 21 वर्षाचा गळीत हंगामाचा बॉयलरअग्नी प्रदीपन समारंभ आज सकाळी संपन्न झाला. 

त्यामुळे या वर्षी गणेश कारखाना सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. गणेश कारखाना सुरू होणार असल्यामुळे गणेश व राहाता परिसरात शेतकरी, सभासद ,ऊस उत्पादक ,कामगार ,दुकानदार व नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. आज 10 ऑक्‍टोबर रोजी गणेश कारखान्याचा अग्नी बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न झाल्यामुळे यावर्षी गणेश कारखाना सुरु होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या गणेश सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून असणारे या परिसरातील सर्व नागरिक यांना मोठा आनंद झाला आहे व यावर्षी गणेश कारखाना चांगल्याप्रकारे चालावा म्हणून सर्व जणांच्या आशा आहेत.आज  येथे गणेश सहकारी साखर कारखान्याचे अग्नी बॉयलर प्रदीपन समारंभाला  माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील, राहाता पं, स. चे उपसभापती ओमेश साहेबराव जपे, कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, व सर्व संचालक, उपस्थित होते. 


त्याआगोदर  आज दि,१०रोजी सकाळी राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील  पाटील सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील  ,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,संचालक शांताराम जोरी, बाबू पडघरमल, संचालिका उज्वला अशोक  घोलप संगीता भास्करराव खर्डे, प्रवरा भाजीपाला सेवा संस्थेचे अध्यक्षा गीता थेट,प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर,प स सभापती नंदा तांबे, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर,कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास राव कडू, जि प सद्स्य दिनेश बर्डे,सर्व संचालक यांच्या उपस्थित प्रवरनगर येथे आज उत्साहात संपन्न झाला. 

राहता तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपऩ  समारंभ आज संपन्न झाल्यामुळे राहता तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी ,सभासद, कामगार दुकानदार ,यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे ,कारण राहाता तालुक्यात हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरू झाल्यानंतर आर्थिक उलाढाल मोठी वाढते, त्यामुळे राहाता तालुक्यातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
close