shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी प्रतिनिधी डॅशिंग महिला पत्रकार कु.किरण जाधव "कसं डिंपल पडतंय गालावरी" या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत..!!

शिर्डी । प्रतिनिधी :
पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावाजलेले नाव म्हणजे कु.किरण जाधव, यांचे पहिले अल्बम साँग १६/१०/२०२० ला रिलीज झाले. पत्रकारांशी बोलताना अभिनेत्री कु.किरण जाधव यांनी सांगितले की, गाण्याची शूटिंग अहमदनगर जिल्यातील राहुरी तालुक्यातील मुळा डॅम येथे झालेली असून,शूटिंग चा कालावधी फक्त ६ ते ७ तासांचा होता.

कु.किरण जाधव या अभिनेत्री आणि अक्षय वेताळ हे अभिनेता मुख्यभूमिकेत दिसत आहेत. श्री.भाऊसाहेब शिंदे (गाव माझा न्यूज, गृहविभाग प्रमुख,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे शूटिंग साठी विशेष सहकार्य लाभले.

दिग्दर्शक : दिलीप साळवे, सुनील काटे, प्रमुख व्यवस्थापक : गौरव बोरकर,स्वप्नील बोरकर, दिपमाला जाधव, साई रणधीर, शिर्डी शहर अध्यक्ष :आकाश भाऊ जाधव, साहिल जाधव, शूटिंग वेळी उपस्थित होते. प्रेक्षकांनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद नोंदवला आहे.

कु.किरण जाधव यांचे त्यांच्या सहकाऱ्यां मार्फत कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच न्यूज मीडिया माध्यम व "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" कडून  कु.किरण जाधव आणि अभिनेता अक्षय वेताळ यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!
close