shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी.. भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य चे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे..!!

इंदापूर । प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे व नदीच्या  ओढ्याच्या पुरामुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने शासनाने पाहणी करून मदत देण्याचे उपाययोजना करण्यासंदर्भात काल भटक्या-विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नावे पत्र तहसील कचेरी इंदापूर येथे देऊन तालुक्यातील तहसीलदार ,गटविकास अधिकारी यांनाही सूचित करून तातडीने तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत देऊन सहकार्य करावे असे पत्राद्वारे म्हटले आहे.

 

इंदापूर १७/१०/२०२०: ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे अतोनात नुकसान व हाल झालेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला आधीच कोरोनाचे संकटाने जेरीस आणले असताना चालू पावसाळ्यात झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेस पूर्ण मेटाकुटीला आणून सोडलेले आहे त्यामुळे जनता हवालदिल झाली असून मायबाप सरकारने अशा स्थितीत तातडीने मदत पुरवावी अशी आशा बाळगून आहे.

राज्य शासनही आपापल्यापरीने नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु तातडीने मदत गरजवंतापर्यंत पोहोचवणे कमी वेगाने प्रशासनाला कामाला लावण्याची गरज आहे. इंदापूर तालुक्यात ही शेतकऱ्यांचे शेती पिकांचे ,तसेच कष्टकरी गोरगरीब यांचे प्रपंचाचे अतिवृष्टीमुळे व आलेल्या पुराच्या पाण्यामुळे आतोनात  नुकसान झालेले आहे इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत तहसिलदार ,गट विकास अधिकारी ,आरोग्य विभागाचे अधिकारी ,कृषी विभागाचे अधिकारी ,महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या द्वारे पावसामुळे झालेल्या हानीची पाहणी करीत असल्याचे दिसून येत आहे .तसेच तालुक्यातील सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त शेती पिकांचे ,घरांचे, गुरे जनावरे ,रस्ता पाझर तलाव ,इत्यादी सर्व ठिकाणचे पंचनामा करून तातडीने सर्व  ठिकाणी मदत करावी असे तानाजीराव धोत्रे यांनी आपले मत  व्यक्त केले.
close