इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
भिगवन: २१/१०/२०२०(ता. इंदापूर जि. पुणे)
“-भिगवण पोलिसांचे माणुसकीचे दर्शन
केवळ माणुसकीतून खाकी वर्दी धावली आणि गरिबाला मिळाले तातडीने जेवण.जेवण मागताच उपाशी नागरिकाला दिला स्वतःचा डबा . खाकी वर्दीतील ही गरिबांसाठी मदत “अनमोल’ ठरली. या घटनेने भिगवणात पुन्हा एकदा पोलिसातील देवमाणूस पाहायला मिळाला.
रात्रीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुंदर कुसाळकर (अध्यक्ष, मानवी हक्क,जागृती संरक्षण समिती इंदापूर तालुका ),गणेश शिंदे,बबलू पालकर ,भीमराव मोरे,डॉ. बू मेंगावडे हे जेवण करून फेर फटका मारत असताना .भिगवण बस्थानाकासमोरील पुलाखाली एक गरीब वृद्ध नागरिकाला रात्रीच्या वेळी ड्युटी वर असणारे पोलीस अधिकारी संदीप कारंडे ,आप्पा भांडवलकर समवेत २ होमगार्ड यांनी पुलाखाली वाहन थांबून त्या नागरिकांची विचारपूस केली तेव्हा त्या नागरिकाने सांगितले की भूक लागली आहे जेवण मिळेल का ? तेव्हा भिगवण पोलिसांनी तात्काळ कोणत्याही वेळेचा विलंब न करता त्याला आपले जेवण देऊन काळजी घेण्यास सांगितले तो गरीब नागरिक मनमुराद जेवण करून त्याने पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले .हा सर्व प्रकार वरील नागरिक पाहत होते.झालेल्या परिस्थिती चे नागरिकांनी कौतुक व मनातून एकाच उदगार काढले
“ना नात्याचा ना गोत्याचा; प्रत्येक खाकी वर्दीतील माणूस माझ्या नात्याचा "
भिगवण पोलिसांनी वेळोवेळी माणुसकीचे दर्शन दिले आहे त्याबद्दल या पोलिसांचे विशेष कौतुक जनतेतून होत असल्याचे दिसत आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुंदर कुसाळकर यांनी दिली व भिगवन पोलीस यांना अशा सामाजिक कार्यामध्ये कार्यतत्परता दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

