shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नूतन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पत्रकार काकासाहेब मांढरे यांचा सत्कार..!!

इंदापूर : प्रतिनिधी 
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नूतन पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी पत्रकार काकासाहेब मांढरे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल दि. १९ अॉक्टोंबर रोजी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर येथील निवासस्थान भाग्यश्री बंगलो याठिकाणी सत्कार करण्यात आला.


माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राहुल शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार पार पडला. 

यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश शहा, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे - देशमुख, इंदापूर शहराध्यक्ष सुरेेश जकाते, वेब न्यूज पोर्टलचे शहराध्यक्ष शैलेश काटे, साप्ताहिक शिवशृष्टीचे संपादक धनंजय कळमकर, पत्रकार सेवा संघाचे कार्याध्यक्ष कैलास पवार, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देविदास राखुंडे, पत्रकार जितेंद्र जाधव, दिपक खिलारे आदी उपस्थित होते.
====================================
close