shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कौटुंबिक हिंसाचार व कायद्याचे संरक्षण "आँनलाईन कार्यक्रमाचे आयोजन.. ! तसेच... "पँरालिगल क्लिनिक" चे उद्घाटन..!!



अलिबाग । प्रतिनिधी(राजेश बाष्टे):
प्रमुख वक्त्या सौ.चित्राताई वाघ (उपाध्यक्ष ,भाजपा) आणि अँड रश्मीताई जाधव (मुंबई हायकोर्ट) यांचे अनमोल मार्गदर्शन...।

                   सौ.चिञाताई वाघ

अलिबाग:- दि. १२ आँक्टोबर रोजी " नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ "आणि " आदर्श शैक्षणिक समूह"* यांच्या संयुक्त विद्यमाने  "कौटुंबिक हिंसाचार व कायद्याचे संरक्षण " तसेच "पँरालिगल क्लिनिक उद्घाटन " याविषयावर मार्गदर्शन पर चर्चा सत्र झूम अँप ,फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आँनलाईन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य होते. नवी मुंबई सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या, आदर्श शैक्षणिक समुहाच्या संचालिका सौ.संगिताताई धनराज विसपुते यांचा  सुवर्णमहोत्सवी वाढदिवस .

              ॲड.रश्मीताई जाधव
                
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक सौ.चित्राताई वाघ (उपाध्यक्षा, भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश), तसेच कायदेशीर सल्लागार अँड.रश्मी जाधव (मुंबई हायकोर्ट) ,तसेच संगिताताई विसपुते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिमा कांबळे यांनी केले. यावेळी सौ.संगिताताई यांच्या जीवनावर आधारित फिल्म दाखवून कार्यक्रमाची सुरुवात झाली .

या कार्यक्रम प्रसंगी सौ.चित्राताई वाघ म्हणाल्या कि,कौटुंबिक हिंसाचार या विषयीच्या बातम्या दररोज वर्तमानपत्र, प्रिंटमिडिया, सोशलमिडियाच्या माध्यमातून येत असतात, यामध्ये कौटुंबिक वाद, मानापमान, हेवेदावे,आजच्या युवापिढी समोर असलेली जूनी रुढी परंपरा इ.मुळे या समस्या निर्माण होतात .पूर्वी एकत्रित कुटुंब पध्दत मध्ये दहा ते पंधरा लोक असायचे.सर्व काही गुण्यागोविंदाने राहायचे. त्या काळात भांडण-वादविवाद व्हायचे पण कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मध्यस्थिने मिटत होते. पण अलिकडच्या काळात ही संस्कृती लोप पावत आहे. याला कारण वेगवेगळे असू शकते.महिलांवर सामाजिक, कौटुंबिक अत्याचार होऊ नये, यासाठी महिला संरक्षणासाठी शासनाने विविध कायदे तयार करून संरक्षण दिले आहे. 

परंतु काही वेळेस पिडितेस न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी मोर्चा, आंदोलने करावे लागतात.याविषयीची माहिती सांगून महिलांच्या शंकेचे निरसन केले. सौ.संगिताताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन  त्यासोबत आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन धनराज जी विसपुते यांच्याही कार्याचा गौरव करून पँरालिगलचे क्लिनिकचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

   कायदे तज्ञ अँड.रश्मी जाधव (मुबंई हायकोर्ट ) यांनी महिलांसाठी शासनाने जे एकूण ३७ कायदे तयार करून संरक्षण दिले. याबाबतीत सर्व खुलासेवार माहिती सांगितली. सामाजिक जीवनात महिलांवर होणारे मानसिक, शारीरिक अन्याय महिला सबलीकरण आणि त्यांच्या साठी  कायद्याचे संरक्षण इ.विषयी मौल्यवान इ.विषयीची माहिती सांगून महिलांच्या शंकेचे निरसन केले.    

यावेळी आदर्श समुहाच्या संचालिका सत्कारमुर्ती सौ.संगिताताई विसपुते यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी  वाढदिवसाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. समाज जीवनात काम करत असतांना कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक जबाबदारी पार पाडत असतांना पती दादासाहेब धनराज विसपुते यांचे अनमोल मार्गदर्शन आणि पाठबळ, आईवडीलांचे  आशिर्वाद, सहकार्यायांचे प्रेम यामुळे चांगले काम करण्याची उर्जा आणि नवीन काम करण्याची संधी मिळाली .

तसेच महाराष्ट्रातील नातेवाईक,नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ, समाजबांधव, आप्तेष्ट इ. आँनलाईन झुम ,अँप फेसबुक लाइव्ह यामाध्यमातून एक हजार च्या वर हजर होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि मान्यवरांचे आभार डॉ. सिमा कांबळे यांनी मानले.

close