shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुराचे पाणी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शिरल्याने अद्यावत उपकरणांचे कोट्यावधींचे नुकसान.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी..!!

इंदापूर : प्रतिनिधी 
दि. १४ अॉक्टोंबर रोजी इंदापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीने शहरातील डॉ. बाळासाहेब राऊत यांच्या राम सिता डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाणी शिरल्याने आतील अद्यावत मशिनचे नुकसान होवून त्यांचे तब्बल तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दि. १७ रोजी पाहणी केली. 

राम-सिता डायग्नोस्टिक सेंटर


डॉ. बाळासाहेब राऊत यांचे शहरामध्ये रुग्णालय असून याठिकाणी राम-सिता डायग्नोस्टिक सेंटर आहे. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये असलेल्या सिटी स्कॅनिंग मशीन, डिजीटल एक्स-रे मशीन, संगणक, प्रिंटर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत. या अतिवृष्टीमुळे रुग्णालयात पाणी शिरल्याने या अद्यावत उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे.याचा रुग्णालयाला मोठा फटका बसला आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राऊत हॉस्पिटल येथे डॉक्टर यांच्या बरोबर चर्चा करताना


याठिकाणी आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देवून येथील परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेण्यात आला.तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केली.

यावेळी डॉ. बाळासाहेब राऊत म्हणाले की, शहरात झालेल्या या अतिवृष्टीमुळे रुग्णालयात पाणी शिरले. रुग्णालयात तीन फुटापर्यंत पाणी पातळी होती. येथे असणाऱ्या अद्यावत मशिनरी तब्बल तीन फूट पाण्यात गेल्याने या मशीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.

साधारणतः तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.अजूनही रुग्णालयातील पाणी इलेक्ट्रिक पंपाच्या साह्याने काढण्याचे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने, प्रशासनाने या झालेल्या  परिस्थितीचा आढावा घेवून आम्हास मदत द्यावी अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली.
close