shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत हळुहळु विशेष रेल्वेसेवाही सुरू व्हावी-- साईभक्त व शिर्डीकरांची मागणी..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. मात्र शिर्डी येथे साई भक्तांना येण्यासाठी रेल्वे सेवा बंद असून येथील साईनगर शिर्डी रेल्वे हे  स्थानकावर सध्या एकही रेल्वे येत नाही.कोरोणामुळे रेल्वेसेवा येथील ठप्प झाली आहे. देशात रेल्वेसेवा काही प्रमाणात आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे .शिर्डीतही आता रेल्वे सेवा हळूहळू सुरू करण्याची मागणी साईभक्त ,शिर्डीकर यांनी केली आहे.

कोरोणामुळे गेल्या सहा महिन्यापासून देशांमध्ये रेल्वेसेवा बंद होती. मात्र आता लॉक डाऊन उठवल्यामुळे व हळूहळु सर्व काही पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे रेल्वेनेही हळूहळू काही मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरु केले आहेत. शिर्डीत अजून रेल्वे सेवा बंद आहे. शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर बंद आहे.मात्र ते लवकरच खुले होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंदिर उघडल्यानंतर साईभक्तांना शिर्डीला येण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. शिर्डीला विमाने सुरू झाली आहेत. खासगी बस सुरू झाले आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस येत आहेत.मात्र रेल्वे सुरु नाही. 

त्यामुळे येथे काही विशेष रेल्वेसेवा  हळूहळू सुरु करण्यात यावी .म्हणजेच साईभक्तांना शिर्डीला येणे सोपे होईल. रेल्वेने प्रवासी भाडे कमी लागते. त्यामुळे साईभक्तांनी व शिर्डीकर यांनी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी स्थानिक रेल्वे सल्लागार समितीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शिर्डी रेल्वे सुरू झाल्यानंतर साईभक्तांचे येणे  वाढेल. येथील व्यवहारही वाढतील. 

असेही येथील दुकानदार बोलत आहेत. रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर येथे रिक्षावाले, लॉजिंगवाले, रेस्टॉरंट, हॉटेल यांनाआर्थिक फायदा होईल. कारण गेल्या सात महिन्यांपासून सर्व ठप्प आहे. रेल्वेने येणारे साईभक्त शिर्डीत एक-दोन दिवस थांबतात. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहार, आर्थिक उलाढाल वाढते. असे येथील आता दुकानदारामधून चर्चा होत आहे.व मागणीही होत आहे.
close