नगर। प्रतिनिधी (शिवा म्हस्के : नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय सुभानराव शिंदे भारतीय सैन्य दलात अनेक वर्षे आपली सेवा बजावत आहेत.पुणे येथुन छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे भंडारपाल या पदावार अनेक वर्षे सेवा करून आज ते पदन्नोतीने जिल्हा सैनिक कर्यालय अहमदनगर येथे साहाय्य जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून रुजू झाले आहे.पदभार स्विकारून आपल्या मुळ गावी देव दर्शन साठी आले असता.दहिगाव ग्रामस्था मार्फत त्यांचा शाल श्रीफळ देऊन श्रीराम मंदिर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी महादेव मेजर, उपसरपंच महेश म्हस्के, रा जाराम हंबडेॅ,अनशाबापु म्हस्के,नाना गायकवाड, विकास म्हस्के, अशोक शिंदे, सखाराम महाराज,अमिर शेख, उमाकांत जावळे, नितीन कावरे,अक्षय शिंदे,केशव म्हस्के, सुनिल म्हस्के, नाना म्हस्के, रज्जाक शेख, प्रत्रकार शिवा म्हस्के ,आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

