इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बाभूळगाव:२६ ऑक्टोबर २०२०. काल बाभूळगाव येथील गलांडवाडी ते बाभूळगाव हा रस्ता अतिवृष्टीमुळे या रस्त्याची अतिशय खराब परिस्थिती निर्माण झाली होती. या रस्त्यावरून चालत जाता येत नव्हते अशी परिस्थिती होती .शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घेण्याची ची गरज होती. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी त्यांच्या सर्वांच्या एकमताने लोकवर्गणीतून खराब झालेल्या रस्त्यावर मुरमीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता येण्या-जाण्यासाठी व्यवस्थित करून घेतला.
सदर रस्ता दुरुस्त केल्याने या रस्त्यावरून जाणारे येणारे वाटसरू यांच्यावतीने या शेतकऱ्यांचे विशेष कौतुक होत असल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेची जनतेतून विशेष आभार मानले जात आहे या रस्त्याच्या दुरुस्तीला विशेष सहकार्य भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे, शेतकरी भारत ऊबरे ,प्रदीप चव्हाण ,सुनील राखुंडे, दीपक गुरगुडे, सोमनाथ जावळे ,नामदेव चव्हाण , बाळासो गुरगुडे, प्रेम कुमार भोसले या शेतकऱ्यांनी सदर रस्त्याची दुरुस्ती केली.

