shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना जन्य परिस्थितीत इंदापूर तालुक्यातील सरपंचांचे काम हे सैनिका सारखे... उपसभापती संजय देहाडे...!!


इंदापूर  ।‌ प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: २७ ऑक्टोबर २०२०.इंदापूर पंचायत समिती येथे काल दिनांक २६ ऑक्टोबर२०२०  दुपारी एक वाजता सरपंच समितीचे अध्यक्ष उपसभापती संजय देहाडे यांच्या अध्यक्षते खाली सदर समितीची बैठक तालुक्यातील सर्व सरपंच यांना आमंत्रित करून आयोजित केली होती या  बैठकीस तालुक्यातील सरपंच उपस्थित होते यावेळी या बैठकीमध्ये सर्व सरपंच यांचा परिचय करून ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान  बाबत चर्चा करण्यात आली व सध्याच्या कोरॉना जन्य परिस्थिती बाबत ही चर्चा करण्यात आली  सरपंच समितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना संजय देहाडे म्हणाले की सहा महिन्यापासून सदर समितीची स्थापना केली असून कोरोना विषाणूजन्य परिस्थितीमुळे सदर बैठक आयोजित केलेली नव्हती आजची बैठक ही इंदापूर तालुक्यातील पहिली बैठक असून या बैठकीमध्ये इंदापूरचे गट विकास अधिकारी परीट साहेब उपस्थित सरपंच महिला सरपंच यांनी या बैठकीस उपस्थिती दाखवल्याबद्दल यांचे विशेष कौतुक करतो तसेच कोरोना जन्य परिस्थितीमध्ये प्रत्येक सरपंच यांनी सैनिका सारखे आपल्या गावामध्ये कार्य करून दाखवले असे काम हे विशेष दखल घेण्यासारखे  आहे तसेच उपस्थित बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या अडीअडचणी या ठिकाणी मांडून त्यावरती संबंधित अधिकारी  यांच्या योग्य मार्गदर्शनातून समितीमार्फत योग्य ती कार्यवाहीचे सूचना करण्यात आल्या यावरून सरपंच समितीचे महत्त्व काय आहे हे आपणा सर्वांना कळून आले सरपंच समिती च्या माध्यमातून गावातील कोणत्याही अडचणी मांडता येतात व त्यावरती मार्गदर्शन ?विचार विनिमय करून त्या कशा पद्धतीने सोडवता येतील यावर विशेष प्रभावी कार्य या सरपंच समितीच्या माध्यमातून करता येते. हे सिद्ध या समिती मधून आज झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


यावेळी गट विकास अधिकारी परीट साहेब यांनी आपले मार्गदर्शन करताना म्हणाले की  महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील नियम ७७ क नुसार पंचायत समितीच्या एकूण ग्रामपंचायत संख्येच्या एक पंचमांश संख्येतील सरपंचांची सरपंच समिती नेमून त्या समितीच्या उपसभापती हे पदसिद्ध सभापती तथा अध्यक्ष असतात तसेच पंचायत समितीचे विस्तार पंचायत हे पदसिद्ध सचिव असतात पंचायत समितीने ग्रामपंचायतीच्या नियंत्रणा विषयक व पर्यवेक्षण विषयक कामाच्या संबंधांमधील सर्व बाबींवर पंचायत समिती सल्ला देणे मदत कार्य करणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे तसेच समितीकडून देण्यात आलेल्या सल्ल्यावर पंचायत समितीने यथायोग्य विचार करावयाचा आहे असे त्यांनी मार्गदर्शन केले तसेच बिल आयोग खर्च , आपत्ती निधी वापर, गट नंबर फेरफार इत्यादी बाबत ही मार्गदर्शन केले. यावेळी आभार सरपंच समितीचे सचिव बगाडे यांनी मानले.
close