shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महापुरुषांचा अपमान....!

गुंडेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच,उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक,प्रशासक यांनी महापुरुषांचा अपमान केल्या बद्ल कायदेशीर गुन्हे नोंदवण्यात यावे. या बाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांची अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) राजेंद्र भोसले यांच्या कडे मागणी..!

शिर्डी  प्रतिनिधी:
कु.किरण जाधव
प्रत्येक सरकारी कार्यालयात महापुरुष चे फोटो (प्रतिमा) लावणे बंधन कारक असताना देखील गुंडेगावातील ग्रामपंचायत कार्यालयात मात्र कोणत्याही महापुरुष चे फोटो लावलेले नाहीत. या बाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन गुंडेगावातील ग्रामपंचायती कार्यलयात महापुरुष चे तात्काळ फोटो लावण्यात यावे. व दोषी  ची चौकशी करून कायदेशीर रित्या गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन केली आहे.

या बाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे उद्या बुधवार दिनांक 28/10/2020 महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन दोषी वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहे.
त्या नंतर जो पर्यंत गुंडेगावातील ग्रामपंचायती मधे महापुरुष चे फोटो लावत नाही तो पर्यंत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे गुरूवार दि  29/10/2020 रोजी गुंडेगावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर सकाळी ठीक 11:00 वाजता आमरण उपोषण करतील.
close