shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबाजोगाई शहरातील राज्य रस्त्यांवर डिवायडरचे होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवा:— अक्षय भुमकर..!!

अंबाजोगाई । प्रतिनिधी:  
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मुख्य राज्य  रस्त्यांवर नव्याने होत असलेले डिवायडरचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हे काम तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीचे पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी दिले आहे.


या मुख्य रस्त्यांवरील डिवायडरचे बांधकाम पुर्वी रस्त्यावरंवर असलेल्या डिवायडरचे च्या खालपर्यंत हि खोदकाम न करता वरच्या वर थोडक्यात चार बोट इतका रस्ता खोदून सिमेंटचे पाणी टाकुन त्यात लोखंडी गज उभारले जात असल्याने साध्या दुचाकी गाडीचा हि धक्का लागला तर ते डिवायडर फुटुन जात आहे अशा निकृष्ट दर्जाचे बांधकाम या ठीकाणी करण्यात येत असल्याने. व वेळोवेळी नियमीत बांधकामावर पाण्याची वाटरिंग हि केली जात नसल्याने हे बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी केली असुन. या सुरू असलेल्या डिवायडरच्या बांधकामावेळी कामाचे व रस्त्याचे नियोजन नसल्याने रस्त्यांवर रहदारी करणार्या अनेक व्यक्तींचा अपघात होवुन अनेक लोक जखमी झाले अाहेत. व हा रस्ता राज्यरस्ता असताना हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असताना हे बांधकाम नगरपरिषदेच्या वतीने कोणत्या पध्दतीने करण्यात येत आहे या विषयीची चौकशी करण्यात यावी व सदरील निकृष्ट दर्जाच्या कामावर कारवाई करून हे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी युवासेना विधानसभा चिटणीस यांनी केली असुन या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब,नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व कार्यकारी अभियांता सार्वजनिक विभाग यांना देण्या आल्या असुन. शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, बीड जिल्हा विस्तारक अंकीतजी प्रभु, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळुक, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेबजी अंबुरे, युवासेना जिल्हा प्रमुख सागरजी बहिर, केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव, तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले व निकृष्ट दर्जाच्या बांधकामा ची लवकरात चौकशी करून तात्काळ कामबंद करून कारवाई करण्यात यावी हि मागणी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी केली आहे.
close