shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आश्रमशाळेच्या धरणे आंदोलनास भेट..!!

इंदापूर : प्रतिनिधी दि.13/10/20
इंदापूर प्रशासकीय भवनासमोर गेली एक महिन्यापासून आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष रत्नाकर मखरे (माजी नगराध्यक्ष इंदापूर ) यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दि.५ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.आश्रमशाळेकडील विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे, आश्रमशाळेकडील कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न त्वरित सोडवावे ह्या व इतर मागण्यां त्यांच्या आहेत.या आंदोलनास काल सोमवारी (दि. १२) राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. 
         

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या वतीने सामाजिक न्याय विभागाकडे केलेल्या मागण्या रास्त असून, या मागण्यांची सोडवणूक सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी व राज्यकर्त्यांनी तातडीने करून त्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावावे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. शासनस्तरावर या मागण्या मान्य होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या रास्त असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी  मनीषा राहुल मखरे आणि आंदोलनकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान, आमच्या मागण्या शासनाने मंजूर केल्याशिवाय आम्ही बेमुदत धरणे आंदोलन मागे घेणार नाही,असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

   हर्षवर्धन पाटील यांचा अधिकाऱ्यांना फोन 
   -----------------------------------------------------
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संगिता डावखर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांना फोन करून आंदोलनकर्त्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात तसेच कोरोना सारख्या महामारीत एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून आंदोलनकर्ते आंदोलनास बसले असून, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार अशी विचारना हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली. तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण खात्याचे मंत्री ना. विजय वडे्डटीवार यांच्या कानावर घालणार असल्याचे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले. 
 _______________________________
close