shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव येथील महादेव धोत्रे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करा,विविध संघटनेची मागणी..!!

संबंधित डॉक्टराची चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन...

सेनगाव । प्रतिनीधी
येथील सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या महादेव धोत्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. या तरुणावर संबंधित डॉक्टराकडुन चुकीचा उपचार करण्यात आल्याचा आरोप विविध संघटनेकडुन केला जात आहे.


विशेष म्हणजे ता.१९ सोमवारी महादेव पांडुरंग धोत्रे वय २७ या तरुणाचे हात पाय दुखत होते. त्यामुळे तो उपचारासाठी शहरातील सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला. यावेळी रुग्णालयातील डॉ.आशीष शंकरराव गोटे यांनी महादेव धोत्रेवर उपचार केले. दरम्यान त्याचे रक्त सुध्दा शहरातील क्लिनिक सेंटरमधून तपासले यामध्ये धोत्रे यांच्या रक्त पेश्या आठरा हजार तिनशेच्या वर गेल्या होत्या. सेनगावच्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसताना त्याला पैशाच्या लालसेपोटी जाणीवपूर्वक थांबवून घेतले व त्याच्यावर योग्य उपचार सोडून इतर उपचार केल्यामुळे महादेव धोत्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. डॉ.आशिष गोटे हे शासकीय सेवेत सापटगांव येथे रुजू झाले आहेत. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरु असल्याचे निवेदकांनी सांगितले आहे. धोत्रे यांच्या उपचारा बाबत त्यांच्याशी विचारणा केली असता यांच्याकडुन उडवा-उडवी ची उत्तरे देण्यात आली.अमोल तिडके व गंगाराम फटांगळे यांना धोत्रेची प्रकृती गंभीर असल्याचे समजले त्यांनी घटनेच्या सकाळी अंदाजे ९ वाजताच्या दरम्यान डॉ.गोटे यांना तरुणाच्या प्रकृती बद्दल सांगितले व तुम्हाला उपचार होत नसतील तर आम्ही हिंगोलीला घेऊन जातो असे विचारले असता त्यांना डॉ.गोटे म्हणाले की मी डॉक्टर आहे. आणि माझ्या उपचारातले तुम्हाला काय माहीत. असे म्हणून जाणीवपूर्वक व्यर्थ वेळ घालवून चुकीचे उपचार केल्यामुळे महादेव धोत्रे या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात येतो.त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन डॉ.गोटे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी. असे विविध पक्ष व संघटनेकडुन प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जय भगवान महासंघ, मराठा शिवसैनिक सेना,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,युवा सेना, भारतीय जनता पार्टी,राजे मल्हार संघटना,ह्यूमन राइट्स रिवोल्यूशन आदी पक्ष व संघटनेने पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, मुख्याधिकारी व शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे,कसल्या ही चौकशीला सामोरे जायला तयार -डाँ.अशिष गोटे

डाँक्टर या नात्याने मी महादेव धोत्रे या रुग्णावर योग्य तेच उपचार केले आहेत.माझ्यावर निष्काळजीपणा केल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो तो बिनबुडाचा आहे.याप्रकरणी मी कसल्या ही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.यामधुन मी निर्दोष सुटणार याची मला खात्री आहे.
close