shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्तरप्रदेश मधील घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी...!!

-वंचित बहुजन आघाडीची मागणी...   
  
प्रतिनिधी। मोहन शेगर :
जामखेड :- उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंद्पा परिसरातील एका गावात 19 वर्षीय (मनीषा) या पीडितेवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला होता. यात पीडितेची जीप कापली तसेच मणक्याचे हाडदेखील मोडण्यात आले आहे. अशा अत्याचार करणार्या नराधमांना त्वरित फाशी देण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.


या बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली. तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ती वाचू शकली नाही. अखेर तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. पीडितेची जिप कापल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. इशाऱ्याने तिने सर्व घटना जबाबामध्ये मांडल्या. बलात्कार करणाऱ्यांमधील संदीप, लवकुश, रामू आणि रवी या चार जणांची नावे देखील घेतली आहेत. घटनेच्या दिवशीच संदिप या संशयित आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी लवकुश आणि रामू यांना अटक करण्यात आली होती. तर फरार झालेल्या संशयित आरोपीला 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आले.

 मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की त्यांच्या घराजवळ राहणारा 20 वर्षीय सुवर्ण समाजातील तरूण आणि त्यांचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देतात. पीडित मुलगी ज्या गावांमध्ये राहते त्या गावात एकूण 600 कुटुंबापैकी केवळ 15 दलित कुटुंब आहेत. तरी दलित समाजावर व अल्पसंख्यांक समाजावर होणारे अत्याचार थांबवावे व पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या सर्व नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा यापुढील काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जामखेड तहसीलदार व जामखेड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ.अरुण जाधव, बापूसाहेब ओहोळ, अतिश पारवे, सागर भांगरे, राकेश साळवे, सुशील राजगुरू, रोहित  भालेराव, धनंजय सदाफुले, वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, गोरख भोसले, तानाजी बाबर यांनी निवेदन दिले.
close