हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथील युवा शेतकरी भागवत नारायण वाघ यांनी विद्युत कोटेशनसाठी २०१३ साली रक्कम भरुन ही महावितरण कंपनीकडुन सात वर्षापासून त्यांना अजुन ही जोडणी दिली नाही.पाच दिवसात विद्युत जोडणी नाही केली तर सहकुटुंब हिंगोली येथील महावितरण कंपनी कार्यालयात दि.७ आँक्टोबर रोजी आत्महदन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
२०१३ साली कोटेशन भरले असून ही मागील सात वर्षापासून लाईन जोडनी पासुन वंचीत आहे त्यामुळे महावितरणने तात्काळ लाईन पोलसह जोडणी करुन द्यावी तसेच गेल्या पाच दिवसांपासून केबल टाकुन लाईन घेतली आहे ज्या शेतातुन लाईन घेतली तो शेतकरी मला १६ हजार रुपयांची मागणी करीत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मला येत्या पाच दिवसात विद्युत जोडणी नाही केली तर मी ७ आँक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११-३० वाजता हिंगोली येथील महावितरण कार्यालयात सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा हिंगोली महावितरण कार्यालयास एका निवेदनाद्वारे दिला आहे.

