shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे मनिषा वाल्मिकी ला न्याय मिळावा व तिच्या परिवाराला सुरक्षा मिळावी म्हणुन निवेदन सादर...!!

प्रतिनिधी। प्रमोद चौधरी:
एरंडोल:- एरंडोल येथील वाल्मिकी मेहतर समाजातर्फे उत्तर प्रदेश येथील उच्च वर्णीय समाजातील तरुणांनी हाथरस येथील दलीत समाजातील मुलगी मनिषा वाल्मिकी हिच्यावर सामुहीक बलात्कार करुन तिचा क्रूर प्रकारे हत्या केल्या प्रकरणी आज एरंडोल येथे देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना तहसिलदार एरंडोल मार्फत निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनात पीडित तरुणीच्या वर कशा प्रकारे बलात्कारी व प्रशासनातर्फे होत आहे या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असुन पीडित मनिषाच्या परिवाराला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे, तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.याच सोबत पीडित तरुणीच्या परिवाराला १ कोटी रुपये देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रात मेहतर समाज रस्त्यावर उतरून प्रदर्शन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

निवेदन देण्यासाठी समाजाचे गोपाल खोकरे,आनंद दाभाडे,फकिरा खोकरे,राहुल पाटील,सुरेश दाभाडे,अमोल तांबोळी,पापा दाभाडे,कन्हैया पवार,संतोष खोकरे,सुनिल खोकरे,धनराज रामसिंग आदी समाज बांधव उपस्थित होते.
close