shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर ते गाणगापूर हि रुईछत्तीसी-करमाळा- सोलापूर-अक्क्लकोट-या मार्गाने एस.टी. पुन्हा सुरू...!!

रूईछत्तीस । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
कोरोना महामारी रोगामुळे सर्व राज्यांतील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.यात आपली ग्रामीण भागातील जीवन वाहिनी लालपरी सुध्दा बंद करण्यात आली होती.भाविक-भक्ताची मागणी व राजेंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे तारकपुर डेपोचे विजय गिते, विभाग नियंत्रण, कल्हापुरे डीएम,केदळकर एटीए,अशोक दांगडे  यांच्या मार्गदर्शना खाली आज पुन्हा अहमदनगर ते गाणगापूर हि रुईछत्तीसी-  करमाळा- सोलापूर-अक्क्लकोट- या मार्गाने महामंडळाने  एसटी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

 नगर- सोलापूर रस्त्यावरील पहिलाच थांबा दहिगाव  येथे दिला आहे. याचे औचित्य साधून तिर्थक्षेत्र श्री राम मंदिर देवस्थान  समोर महामंडळाच्या बसला विधिवत पुजा, फुल,हार, श्रीफळ फोडुन  चालक गोरख कोकाटे, वाहक सुभाष झांबरे, यांचा उचित सत्कार, सन्मान करण्यात आला व बस आपल्या मार्गाने पुढील प्रवासासाठी  प्रवाशांसह मार्गस्थ झाली.

या प्रसंगी ओमदत्त जनार्धन स्वामी आश्रम, गाणगापूर चे ह.भ.प.राजेद्र सावंत, सतिश म्हस्के, रावसाहेब जावळे,संजय सावंत, सुभाष पवार,चंद्राकांत म्हस्के, मधुकर म्हस्के,सुनिल म्हस्के, शिवाजी साळुंके, निलेश पोटरे, अमिर शेख, शिवाजी म्हस्के, लक्ष्मण ढेरे, भानुदास ढेरे,आसाराम वाघ, जालिंदर बनकर, रावसाहेब बोरूडे, या वेळी आदि मान्यवर व दहिगाव साकत येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close