shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरखेडा हत्याकांडातील आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करुन फाशी ची शिक्षा द्या...!!

एरंडोल । प्रतिनिधी ( प्रमोद चौधरी ):
भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे तर्फे एरंडोल उपविभागीय अधिकारी मा विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावालगत एका आदिवासी कुटूंबातील एका पंधरा वर्षीय मुली वर अत्याचार करुन तीच्या सह तीन भावंडांची निर्घुन हत्या करण्यात आली.


 या संदर्भात दि.20/10/2020 एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांना भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन फाशी ची शिक्षा द्यावी अन्यथा पिडीत कुटूंबांना न्याय न मिळाल्यास भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य भारतातील सर्व आदिवासी संघटनां सोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल व आक्रमक भावनेने जमावा कडून काही अपरिचीत घटना घडल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. 

असा इशारा या वेळी निवेदन व्दारे देण्यात आले आहे. या वेळी निवेदन देतांना. दिपक अहिरे ( जळगाव जिल्हाध्यक्ष ) दारासिंग पावरा ( जिल्हाध्यक्ष.अ भा आ वि प )  निहाल सोनवणे ( एरंडोल तालुकाध्यक्ष ) सागर वाघ (  जिल्हाप्रमुख सोशल मिडीया सेल ) आबा सोनवणे देवराम वाघ किरण मालचे प्रविण पावरा विकास गायकवाड कैलास बोरसे महेंद्र मालचे इच्छाराम सोनवणे निवृत्ती मालचे मधुकर सोनवणे विनीत महाले समीर तडवी संदिप ठाकरे खंडु बोरसे आदी कार्यकर्त पदधिकारी  उपस्थित होते.
close