श्रीरामपूर । प्रतिनिधी :
महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात आज दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी दोन वाजता झालेल्या बैठकीत संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमी चे पुरस्कार प्राप्त करते -अब्दुल्ला भाई चौधरी यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर तर पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटर चे संस्थापक अध्यक्ष इदरीस शेख यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच घाटकोपर मुंबई येथून आलेले सय्यद असिफ अली यांची घाटकोपर तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते.
बैठकचे सूत्रसंचलन अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले..यावेळी मार्गदर्शन करताना शेख बरकत अली यांनी सांगितले की महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या पंचवीस वर्षापासून राज्यभर कार्यरत आहे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी सोडविणे व त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा विमोड करून पत्रकारांचा सर्वांगिन विकास व पत्रकारांवर होणारे अन्याय-अत्याचारा च्या वेळेस पत्रकाराला आपल्या कुटुंबातील सदस्य जाणून त्याच्या पाठीशी उभे राहणे व गरज पडल्यास त्याला आर्थिक सहाय्य करणे याचबरोबर तालुका पातळीवर पत्रकार वसाहत पत्रकार भवन या कामाकरिता जागा उपलब्ध करून घेणे तसेच या कामांना पूर्ण करणे याकरिता पत्रकार संघ कार्यरत आहे.
या नवोदित पदाधिकाऱ्यांचा पत्रकार संघाच्या वतीने यावेळी पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीस पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.के.सौदागर,प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख, गुलाब वायरमन संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह आदीपत्रकार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार बि.के. सौदागर यांनी मानले.

