इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माभोसले व सर्व संचालक मंडळाच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे ,संचालक मंडळ, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
बिजवडी 11 ऑक्टोबर 2020 रोजी कर्मयोगी कारखाना च्या 31 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, तालुक्यातील 14 लाख टन गाळपाचे उदिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले असून. साधारणतः पावणे बारा ते बारा पर्यंत साखर उतारा अपेक्षित आहे.यासाठी कारखान्याचे शेती विभाग,कर्मचारी,अधिकारी यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्यामुळे विक्रमी गाळपाचा हंगाम यावर्षी आपणाला करावा लागणार आहे.
प्रतिदीनी दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळपाला येईल.आठ ते नऊ हजार मेट्रिक टन प्रतिदीनी आपण गाळप करू शकू असे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच 75 लाख लिटर्स इथेनाँल आपण तयार करणार आहोत. याचबरोबर इथेनाॅलची थोडी क्षमता देखील वाढवली असून डिस्टलरी मधून सव्वा कोटी पर्यंतचे बायो प्रोडक्ट तयार करणार आहोत.यावर्षी सेंद्रीय खत चार लाख बँग तयार करण्याचे उदिष्ट आहे.असे एकंदरीत चित्र पाहिले तर चांगला गळीत हंगाम होईल.
कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतूकदार,तोडणी मुकादम व सर्व कामगार यांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करुन हा गळीत हंगाम यशस्वी करणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.


