शहाजीनगर (ता.इंदापूर): येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 च्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते आज रविवारी (दि.11) उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते.
याप्रसंगी काटापूजन कारखान्याचे संचालक भागवत गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, प्रतापराव पाटील, दत्तात्रय शिर्के, दादासो घोगरे, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील आदी उपस्थित होते.
________________________________

