shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपकेंद्र तक्रारवाडी च्या वतीने कोविढ १९ गुढी महोत्सव साजरा..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
कोरोनाविषाणू जन्य परिस्थिती इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी उपकेंद्र यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत मदनवाडी ,पोंधवडी, तक्रारवाडी या गावातील ग्रामस्थांच्या सहभागातून कोविढ १९ गुढी महोत्सव गुढी उभा करून शासनाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला यावेळी संपत बंडगर, सचिन भागवत नाना बंडगर, आम्रपाली बंडगर प्रवीण वाघ मान्यवर उपस्थित होते.


तक्रारवाडी ११ ऑक्टोबर २०२० रोजी माझे कुटुंब माझी जबाबदारी  Covid 19गुढी महोत्सव उपकेंद्रे  तक्रारवाडी अंतर्गत ग्रामपंचायत मदनवाडी, पोंधवडी ,तक्रारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने  व्यंकटेश लॉन्स येथे सकाळी नऊ वाजता आयोजित केलेल्या या वेळी कोरोना जनजागृति रंगोली,केक, कोरोना रुग्णाला पोषक आहार ठेवण्यात आले तसेच बालिका दिन साजरा करण्यात आला पदाधिकारी  ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य सर्व आशा अंगणवाडी सेविका मदतनीस, शिक्षक यांनी उपस्थित होत्या अशी माहिती डॉक्टर मृदुला जगताप यांनी दिली.


कोरोनाविषाणू जन्य परिस्थितीच्या या काळात डॉक्टर मृदुला जगताप व त्यांच्या टीमने तक्रारवाडी उपकेंद्र अंतर्गत सर्व गावांमध्ये अतिशय प्रामाणिक पणे काम करून रुग्णसेवा केलेली आहे ते अशा कार्यक्रमातून त्यांचे कार्य  दिसत आहे.
close