इंदापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीचे संस्थापक,अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष काकासाहेब मांढरे व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली,उपस्थितीत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांना समितीच्या विविध मागण्यांसाठी आज दि. १२ रोजी निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, गरीबी निर्मुलनाचा प्रश्न, वाढती महागाई, बेरोजगारी समस्या,शिक्षण व आरोग्याच्या समस्या, गरीब शेतकऱ्यांच्या समस्या ह्या सरकार बदलले तरीही वर्षानुवर्षे तशाच आहेत. त्या सोडवाव्यात त्यांचे निर्मुलन करावे अशी कोणत्याही सत्ताधाऱ्यांची इच्छा झालेली नाही.
महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य म्हणतात या राज्यात यासमस्यांवर ठोस उपाय व योजना जनतेला दिलासा देवून त्यांचे जगणे सुखकर केले जावे मात्र आपल्याकडे तसे होताना दिसत नसल्याने हे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यामुळे शिक्षण,सत्ता,संपत्ती यापासून प्रचंड मोठी जनसंख्या ही हजारो वर्षांपासून वंचितच राहिलेली आहे.कष्टकरी, उपासमार या शिवाय गरीब माणसाच्या वाट्याला ७२ वर्षात काहीही आलेले नाही.
म्हणून सरकारने या सर्व बाबींचा विचार करुन गरिबी निर्मुलन करण्याकरीता कायदा करण्यात यावा, मंत्री मंडळात स्वतंत्र मंत्री नेमावा, मंत्रालयात गरीबी निर्मुलन मंत्रालयात विभाग निर्माण करावा तसेच रोजगार हमी योजनेमध्ये मजुरास प्रतिदिन ५०० रुपये देण्यात यावे.कोरोना महामारीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही फार बिकट बनली आहे. त्यांना दिलासा म्हणून एक वर्ष त्यांच्या जनधन
बँक खात्यामध्ये महिना दहा हजार रुपये मंजूर करण्यात यावे. सर्व कष्टकरी मजुरातील कुटूंब प्रमुखांचे मृत्यू होवून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी अशा कुटुंबांना शेतकरी अपघात विम्याच्या धर्तीवर आर्थिक दुर्बल मजूर अपघाती विमा संरक्षक कवच देण्यात यावे अशी मागणी गरीबी निर्मुलन समितीच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष काकासाहेब मांढरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर, संपर्क प्रमुख दिपक खिलारे, तालुकाध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष आसिफभाई शेख या पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
====================================

