shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक संविधान व संसदीय संघ (WCPA) कडून कोरोना योध्दांचे सन्मान...!!


श्रीरामपूर:- जगभरात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. या महामारीमुळे संपुर्ण जग भयभीत झाले आहे. अशावेळी सामाजिक हित जोपासत काही मानवताप्रेमी बांधवांनी जगाला विळखा घातलेल्या कोरोना महामारीच्या थैमानाला न घाबरता मानवसेवेत झोकून घेतले, कसलीही तमा न बाळगता "जनसेवा हीच ईश्वर सेवा" समजून या कठीण प्रसंग काळात देखील सेवा योगदान देऊन आपले मानवतावादी कर्तव्य पार पाडले.
                      डाॅ.संतोष  मोरे, नेवासा 


        श्री. विक्रम गायकवााड (API), चाकण


        श्री. शिवाजी भालेराव, मुुुख्याध्यापक

या महान गौरवास्पद कार्याची दखल घेत जागतिक संविधान व संसदीय संघ(WCPA) यांच्यावतीने 
डॉ. संतोष ताराचंद मोरे. कोरोना टीम नेवासा. डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर, नेवासा. प्रथम वैद्यकीय अधिकारी गट अ, महाराष्ट्र शासन;  श्री.विक्रम सिताराम गायकवाड A.P.I.चाकण पोलिस स्टेशन चाकण ता. राजगुरुनगर जि.पुणे व श्री.शिवाजी संपत भालेराव, मुख्याध्यापक, श्रीरामपूर  यांना " Covid 19 वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वारीयर्स " हे सन्मान पञ देऊन गौरवण्यात आले. यामुळे या कोरोना योध्दांचे सुनिल जोर्वेकर, अनिल शिर्के, मुकुंद जगधने, राजेंद पवार, बंडू पवार ,राजेश घोरपडे, प्रकाश पवार, रमेश जेठे, अनिल फोफसे, भाऊसाहेब घोडके, किशोर जेठे ,शरद लांडगे, बंडू जोशी, रफीक शेख व वडाळकर, नेवासाकर, चाकणकर ,बाळू सिरसाट यांनी कौतुक व अभिनंदन केेले आहे.
close