shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मान..!!

इंदापूर । प्रतिनिधी
खबर सबसे तेज ग्रुप वालचंदनगर   
यांच्यावतीने जनसामान्यांचे नेतृत्व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.


इंदापूर  दि. १८ ऑक्टो. 2020 खबर सबसे तेज ग्रुप वालचंदनगर यांच्यावतीने . हनुमंत केंगार  व पत्रकार  अमोल रजपुत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनसामान्यांचे नेतृत्व  राजवर्धन पाटील यांचा कोरोना महामारी च्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल "कोरोना योद्धा "म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून उचित असा  सन्मान केला. कोरोनाचा हा काळ अनेक संकटानी भरलेला असताना राजवर्धनदादांनी केलेल्या समाजिक कार्याचा हा सन्मान आहे. राजवर्धन दादांनी अविश्रांतपणे विविध पातळ्यांवर जनसामान्यांची मदत केली, त्यांच्या सुखदुःखाला धावून गेले. या त्यांच्या कार्याची दखल सबसे तेज ग्रुप वालचंदनगर यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक जनतेतून होत असल्याचे दिसत आहे.
close