पाथर्डी:- घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शनिवार दिनांक :17 /10/ 2020 रोजी प्राथमिक शिक्षक बँक शाखा पाथर्डी येथील इमारतीचे नूतनीकरण उद्घाटन सोहळा पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजीव राजळे व माजी समाजकल्याण सभापती श्री अर्जुनराव भगवानराव शिरसाट( भाऊराव) यांच्या शुभहस्ते मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून पाथर्डी पंचायत समितीचे सभापती श्री गोकुळ भाऊ दौंड, उपसभापती श्री रवींद्र भाऊ वायकर, माजी सभापती श्री विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ ओव्हाळ, श्री एकनाथ काटकर, अहमदनगर जिल्हा शिक्षक संघ तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष श्री.बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन श्री.शरदराव सुद्रिक, व्हाईस चेअरमन श्री.अर्जुनराव शिरसाठ, माजी चेअरमन श्री.साहेबराव अनाप, माजी चेअरमन श्री.संतोष दुसुंगे, बँक शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री.सलीमभाई पठाण, बँकेचे संचालक श्री अनिल भवार, नगरपालिका शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.मच्छिंद्र लोखंडे, राज्य उपाध्यक्ष श्री दत्ता पाटील कुलट, नाशिक विभागीय सरचिटणीस श्री सत्यवान मेहेरे, जिल्हा संघाचे उत्तर प्रमुख श्री.राजकुमार साळवे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळाचे श्री.बाळासाहेब तापकीर, जिल्हा संघटक श्री.किशोर माकोडे, जिल्हा नेते श्री नारायणराव पिसे, गुरुमाऊली मंडळ सरचिटणीस श्री. विठ्ठलराव फुंदे उपस्थित होते.
शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन श्री अर्जुनराव शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.बेग आरिफ यांचा तसेच श्री.संदिप राठोड-पर्यावरणस्नेही शिक्षक मित्र पुरस्कार, श्री.राघु जपकर- आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री.दिपक महाले-व्यंगचित्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
प्रमुख मनोगते..
माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप - शिक्षक बँकेचा कारभार गुरुमाऊली मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रामाणिक व पारदर्शीपणे होत आहे. मागील वर्षी सव्वा दोन टक्के फरकाने कारभार केला सध्या 2.65 टक्के फरकाने कारभार चालू आहे. यापुढेही सभासद हिताचाच कारभार होईल. काही मंडळींच्या अहंकारामुळे गुरुमाऊली मंडळाला ग्रहण लागले परंतु 2015 मध्ये स्थापन झालेले गुरुमाऊली मंडळ हेच यापुढेही टिकणार आहे कारण इथं लोकशाहीने निर्णय घेतले जातात सर्वांना विश्वासात घेतले जाते, जे बाजूला गेले त्यांचा कार्यभाग साधला , त्यांना जाऊ द्या... माऊली चा आशीर्वाद आपल्यावरच असणार आहे.
चेअरमन श्री शरद सुद्रिक- शिक्षक बँकेचा कारभार अतिशय काटकसरीने सुरू असून मी एक निमित्तमात्र आहे आपण सर्वजण चेअरमन आहात. शिक्षक बँक सर्व सभासदांची कामधेनु असून मयत सभासदाचे बत्तीस लाखापर्यंत कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपये देते. सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजनेअंतर्गत अकरा हजारांची भेट देण्यात येते. सभासदांच्या गंभीर आजार या प्रसंगी पंचवीस हजाराची मदत केली जाते. विविध सभासद हिताच्या योजना राबवून सभासदांना लाभांश सुद्धा योग्य दिला जातो. लाभांश वाटप निबंधकांच्या परवानगी मिळाल्यावर तात्काळ करण्यात येईल.
गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष श्री.बापूसाहेब तांबे- आपण सर्व सभासद मिळून बँकेच्या कारभाराची चाकोरीबद्ध व्यवस्था करणार आहोत... मागील सर्वसाधारण सभेत बाहेरच्या ठेवी प्रमाणे कायम ठेवीला व्याज देण्याचा पोटनियम केला....आता येणाऱ्या सर्वसाधरण सभेत अडीच ते तीन टक्के फरकाने कायम ठेव आणि कर्ज यांचा व्याजदर असावा यासाठी पोटनियम करणार आहोत ....कोणतेही मंडळ आले तरी सभासदांना काळजी करण्याचे कारण नाही.. आपल्या शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्यासाठी आमदार साहेबांनी मदत , मार्गदर्शन करावे तसेच आमच्या डीसीपीएस बांधवांना जुनी पेन्शन मिळण्यासाठी विधानसभेत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी केली.
माननीय आमदार श्री मोनिकाताई राजीव राजळे- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक ही आशिया खंडातील एक नावाजलेली बँक असून आपल्या सभासदांचे पूर्ण पालकत्व घेणारी आहे. पाथर्डी शाखेच्या इमारतीचे नूतनीकरण सुंदर झाले असून या बँकेच्या राज्यक्षेत्र विस्तारासाठी सर्वतोपरी मदत मी नक्कीच करेन. जुनी पेन्शन संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडून सकारात्मक भूमिका घेण्यासाठी प्रयत्नशील राहील. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ एक जुनी आणि प्रबळ संघटना असून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेता या मंडळाच्या कार्यकाळातील बँकेचा कारभार सभासदांच्या हिताचा दिसून येतो त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर शिरसाट, भिमराव चाचर, संजय चव्हाण, भास्कर दराडे, संतोष कोकाटे, मंजुषा वराडे, मिनिनाथ देवकर, महेश फुंदे, संभाजी दराडे, विजय बडे, अंबादास आंधळे, रविंद्र फुंदे, बंकट बडे, वाल्मिक बडे, चंद्रकांत फुंदे, उत्तम तांबे, महेश वाघमोडे, हर्षल धायतडक, महेश चव्हाण, गणेश वाघ,यांचे सह तालुक्यातून अनेक संघप्रेमी व गुरुमाऊली मंडळ प्रेमी शिक्षक बंधू भगिनी आवर्जुन वेळात वेळ काढून उपस्थित होते...
या सर्वांचे गुरूमाऊली परिवाराच्यावतीने आभार मानण्यात आले.

