सावळीविहीर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड सेंटर मधील बलात्कार असो, किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांच्या बाबत राज्याचे लक्ष नाही.अश्या घटनामध्ये सध्या राज्य पुढे चालले आहे. याचा निषेध करत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने आंदोलन करून प्रांताधिकार्यांना आज निवेदन देण्यात आले.व महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी करण्यात आली.अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .असा इशाराही देण्यात आला आहे.
शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना भाजपा महिला आघाडीच्या वतीने हातात फलक घेऊन हे निवेदन देण्यात आले असून या निवेदनात पुढे म्हटले आहे की,महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड सेंटर मधील बलात्कार असो, किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांच्या बाबत असो,सरकार मात्र शांत आहे.भाजपा महिला आघाडीने महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा पाठपुरावा केलेला आहे.पीडीत महिलांच्या कुटूंबियांनी स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देउन वेळोवेळी कारवाईची मागणीही केलेली आहे.
परंतु सदर घटनासंदर्भात सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून आले.यावरून या महाविकास आघाडी सरकारची महिला सुरक्षितेबाबतची असंवेदनशीलता आणि निष्क्रियता दिसून येते.या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिलांच्या अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही.हे असेच चालले तर अश्या घटनामध्ये आणखी वाढ होईल व ते राज्याला भुषणावह नाही.अश्या घटना परत घडु नये यासाठी प्रयत्न सरकारने करावा.
अन्यथा भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राज्यभर तीव्र आंदोलन करतील. असे या पत्रकात म्हटले आहे.यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ,शिर्डी युवा मोर्चा,व शिर्डी शहराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

