सावळीविहीर(प्रतिनिधी) :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्राकरीता गोयंका ग्रुप, शांती एंटरप्रायसेस, मुंबई यांनी ०५ लाख १० हजार १४४ रुपये किंमतीचे अत्यावश्यक औषधे देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याकडे गोयंका ग्रुपच्या वतीने नाना गुरव यांनी सुपूर्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांनी श्री.गुरव यांचा सत्कार केला.
याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.मैथिली पितांबरे, स्टोअर मॅनेजर दिलीप शर्मा, रुग्णालयाचे प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, खरेदी व्यवस्थापकह कुणाल आभाळे आदी उपस्थित होते. या देणगीमुळे गोइंका ग्रुप चे साईभक्त तसेच कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोरोना केअर सेंटर व कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या साठी येथे सुरु असलेल्या विलगीकरणात कक्षात दिवसागणिक संख्या वाढत आहे.त्यामुळे औषधांची गरज पडत आहे.तेव्हा हि मदत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे साईभक्त शिर्डीत करांमधून समाधान व्यक्त होत आहे.

