shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन देऊन ही न.पं.चे दुर्लक्ष..!!

हिंगोली ।‌ प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरात अनेक महिन्यांपासून मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्याने या जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन स्वप्नील देशमुख यांनी सेनगांव नगरपंचायतला महिन्यापुर्वी दिले होते.मात्र अद्याप ही मोकाट जनावरांचा मुक्तसंचार पहावयास मिळत असल्याने याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


सेनगांव शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने हे मोकाट जनावरे आठवडी बाजारात हिंडत आहेत व रोडवरच ठाण मांडून बसत असल्याने नागरीकांना भाजीपाला घेण्यास व रहदारीस अडथळा येत आहे.तसेच सायंकाळी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन नासधुस करीत आहेत.नगरपंचायतने मोकाट जनावरा करीता बंदीस्त कोंडवाडा केला आहे.तरी देखील अद्याप ही एक ही जनावर कोंडवाड्यात डांबु शकले नाहीत असा ही आरोप या निवेदनात करण्यात आला.तरी ही नगरपंचायतने या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन  स्वप्नील देशमुख यांनी एक महिन्यापूर्वी सेनगांव नगरपंचायतला दिले होते.मात्र निवेदन देऊन ही मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याचे दिसून येत आहे.

   (प्रतिक्रिया)
सेनगांव शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन नगरपंचायतला एक महिन्यापूर्वी दिले असून याबाबत नगरपंचायतने अद्याप ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही हे नगरपंचायतचे अपयश असुन तात्काळ याचा बंदोबस्त न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे
         
स्वप्नील भगवानराव देशमुख रा.सेनगांव (नागरीक)
close