shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव निबंधक कार्यालयात खोटे खरेदीखत करीत असल्याची मा.नोंदनी महानिरीक्षकाकडे तक्रार..!!

हिंगोली ।‌ प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मुळ जमिन मालक सोडुन खोटा विक्रीदार उभा करुन खरेदीखत नोंद केल्याने दुय्यम निबंधक सेनगांव,दस्ता मधील सर्व सह्या करणारे पक्षकार व दस्त लेखक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दि.३०-०९-२०२० रोजी मा.नोंदनी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक साहेब यांना भारतीय मानवाधिकार संगठन हिंगोली जिल्हाध्यक्ष मिंलीद प्रधान यांनी दिले आहे.


सेनगांव तालुक्यातील मौजे धानोरा बंजारा येथील जमिन गट क्रमांक ११२ मध्ये रामेश्वर हानवंता मजुळकर यांची २ हेक्टर २२ आर जमिन असुन त्यापैकी १ हेक्टर २० आरचे दि.१८-०९-२०२० रोजी खरेदी खत क्रमांक १३११/२०२० वर मुळ जमिन मालका ऐवजी दुसरीच व्यक्ती उभी करुन व शासकीय अभिलेखामध्ये बदल करुन अनु क्रमांक १)दुय्यम निबंधक सेनगांव.२)खोटा विक्रीदार परमेश्वर हानवंता मंजुळकर.३)जमिन घेणार अशोक नारायण वानखेडे.४)साक्षिदार क्र.१)दगडु सटवाजी मंजुळकर.२)साक्षिदार हानवंता मंजुळकर.३)दस्त लेखक शिवाजी नारायण गोरे यांनी सर्वांनी मिळुन संगणमत करुन हा खरेदी खताचा दस्त नोंद करुन मुळ जमिन मालक जो बेपत्ता आहे त्यांच्यावर अन्याय केला आहे.तसेच दस्त नोंद होऊन बरेच दिवस झालेले असतांना मा.दुय्यम निबंधक साहेब सेनगांव यांनी संबधीत खोट्या पक्षकारावर कोणतीही कार्यवाही केली नाही.याचा अर्थ ते स्वत: या प्रकरणात सामील आहेत व ते सदर प्रकरण मिटविण्याच्या प्रयत्नात आहेत.

सदर व्यवहार करतांना भरपुर पैशाची देवान-घेवान झाल्याचा आरोप देखील प्रधान यांनी निवेदनात केला आहे.स्वत: दस्त लेखक शिवाजी गोरे यांनी मला असे सांगितले आहे की,हा दस्त साहेबांनी केलेला आहे व मला फक्त सही करण्यासाठी बोलावले होते.त्यामुळ आपण स्वत: सदर प्रकरणी गांभिर्य पुर्वक लक्ष देऊन दुय्यम निबंधक सेनगांव,हस्ता मधील सर्व सह्या करणारे,पक्षकार व दस्त लेखक यांच्यावर भारतीय नोंदनी कायदा १९०८ चे कलम ८२ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन आपल्या कार्यालयाकडुन दुय्यम निबंधक सेनगांव यांच्यावर निलंबना सारखी किंवा बडतर्फी सारखी योग्य ती कार्यवाही करावी जर आपण वरील व्यक्ती विरोधात कोणती ही कार्यवाही न केल्यास भारतीय मानवाधिकार संगठन हिंगोली कडुन आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण,आदोंलन,मोर्चा सारखे तिव्र आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या आँनलाईन निवेदनात मिलींद प्रधान यांनी नमुद केले
close