इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
तावशी:२५ ऑक्टो.२०२०. तालुक्यातील तावशी येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गावातील ग्रामस्थांना कोरोना वरती गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने १२ बेडचे कोविडं सेंटर उभारण्यात आले आहे.यावेळी सेंटरचे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तावशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सीमादेवी सपकाळ व इंदापूर अर्बन बँकेचे संचालक लालासाहेब सपकाळ यांच्या संकल्पनेतून व तावशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविडं सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत सरपंच व सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगला उपक्रम राबविला आहे, कोविडं सेंटर मुळे गावातील नागरिकांना गावातच उपचार मिळतील.
याप्रसंगी इंदापूर अर्बन बँकेचे संचालक विलास माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, प्रवीण पानसरे, व तावशी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

