shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मध्ये ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा..!!

इंदापूर : प्रतिनिधी.
इंदापूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


सुरुवातीला पुणे जिल्हा आर.पी.आय.चे सचिव-संघटक मा. शिवाजीराव मखरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी दिप प्रज्वलन करुन गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली. 

पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

आर.पी.आय.चे पुणे जिल्हा सचिव-संघटक शिवाजीराव मखरे, प्रा. बाळासाहेब मखरे, प्रा. अशोक मखरे,अॅड.किरण लोंढे आदी मान्यवरांनी बौद्ध धम्माविषयी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, आर.पी.आयचे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार सोनवणे, जनार्दन खरे, तुषार मखरे, सुखदेव मखरे, काजल लोंढे, प्रतिक्षा मखरे, धम्मदिनी मखरे, पौर्णिमा मखरे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित मखरे, आकाश जाधव, अनार्य मखरे,पंचशील सरवदे,सिद्धांत खरे,बोधिसत्व मखरे,आकाश मखरे,आशुतोष मखरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

===================================
close