हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२५,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील मौजे दाताडा(बु) येथील ३२ वर्षीय तरुण शेतकरी ढगाळ वातावरण पाहुन सोयाबीनची सुडी झाकायला गेला असता साप चावुन जाग्यावरच मृत्यु झाल्याची घटना दि.२४ आक्टोबर शनिवार रोजी घडल्याने दाताडा येथे दसरा सणावर शोककळा व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सेनगांव तालुक्यातील मौजे दाताडा(बु) येथील तरुण शेतकरी अवधुत रंगराव मस्के (३२) यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची काढणी करुन एका ठिकाणी सुडी घालुन कापडाने झाकली होती परंतु आभाळ स्वच्छ दिसत असल्याने ते दि.२४ आँक्टोबर शनिवार रोजी सकाळी १० च्या सुमारास शेतात गेले व भिजलेल्या सोयाबीन सुडीवरील कापड काढुन ते घराकडे आले.सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघुन ते परत सोयाबीनची सुडी झाकण्यासाठी गेले असता त्यांना साप चावल्याने त्यांचा जागीच मृत्यु व ते तिथेच कोसळले.सायंकाळचे सात वाजले तरी ही सोयाबीनची सुडी झाकण्यासाठी गेलेले अवधुत मस्के घरी का आले नाही म्हणून त्यांचे काका त्यांना बघावयास गेले.अवधुत मस्के हे सोयाबीन सुडीजवळच कोसळले असल्याचे काकाच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ त्या शेतकर्यास सेनगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डाँक्टरांनी हिंगोली येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यास सांगितले.हिंगोली येथील डाँक्टरांनी शेतकर्याचा मृत्यु झाल्याचे घोषीत केले व त्या शेतकर्यांचे पिएम करण्यात आले होते.आज दि.२५ आक्टोबर रविवार रोजी पिएम केलेला अहवाल आला असुन तरुण शेतकरी अवधुत रंगराव मस्के यांचा मृत्यू साप चावल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती तेथील वरीष्ठ डाँक्टरांनी दिली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संकेत नाईक यांनी "शिर्डी एक्सप्रेस न्युज"शी बोलतांनी दिले.मयत तरुण शेतकरी अवधुत रंगराव मस्के यांची परीस्थिती अंत्यत हलाखीची असुन त्यांच्या पश्चात पत्नी एक चार वर्षाचा मुलगा व सहा महिन्याची मुलगी असुन त्यांच्या कुटुंबाना शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्याकडुन केली जात आहे.

