shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येळी येथे आ. शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते 5 लक्ष रु. कामाच्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन....!!

लोहा (प्रतिनिधी ):-तालुक्यातील येळी येथे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लक्ष रुपयाच्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पा. सोमवारे, प्रमुख पाहुणे माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील शिंदे ,भास्करराव पाटील जोमे गावकर, गोविंदराव पाटील चिंचोलीकर, राजू पाटील वडव ळे, गोविंदराव जहागीरदार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी सी .सी रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आ. शिंदे म्हणाले की येळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून ,आगामी काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे ही आमदार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. येळी गावचा लवकरच आपण कायापालट करणार असून येळि गावच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास नेण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. 

रस्ते, सिंचन, कृषी आरोग्य, शिक्षण ,रोजगार यासाठी आगामी काळात भरघोस निधी उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले. यावेळी या कार्यक्रमास उत्तम पाटील वडवळे, पप्पू भुरे ,परमेश्वर शिंदे, गणेश ढेपे, सरपंच प्रभाकर पाटील गोळेगावकर, अनिकेत पाटील जमे गावकर, श्याम पाटील सावळे, गोपीराज हंबर्डे, उपसरपंच पंडित पाटील ,सुभाष ढगे ,दादाराव ढगे , देविदास ढगेसह मोठ्या संख्येने गावकरी सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.
close