shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहीर येथे धम्मचक्र परिवर्तन दिन आज उत्साहात साजरा..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी):-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर
बु।। येथे विजया दशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे होते.

विजयादशमीला चित्र परिवर्तन दिन असतो म्हणून आज रविवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिनी सावळिविहीर बु।। येथील स्मारक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सन्माननीय मान्यवारांनी पुष्पहार अर्पण करुन वंदना, भिम स्मरण आणि भिम स्तुती बौध्दाचार्य गौतमजी गोडगे ,सुशांत पवार,बाबासाहेब पगारे यांनी वंदना घेऊनअभिवादन करण्यात आले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती उमेश जपे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला  बौध्दाचार्य गौतम गोडगे, सुशांत पवार ,बाबासाहेब पगारे, राहाता पंचायत समिती उप सभापती ओमेशभाऊ जपे पा.माजी सरपच सोपान पवार,आगलावे सर (भाऊ)गोकुळ पवार ,रविंद्र मधुकर वाघमारे ,भास्कर वाघमारे,साळवे बाबा, दिपक कोळगे,बाळासो जपे,प्रमोद कोपरे,राम वाघमारे,शरद पगारे, पप्पुभाऊ वाघमारे,रवी वाघमारे, जाधव, पुंडलीक पवार आदीसह मान्यवर ऊपस्थित होते. मास्क बांधून व सामाजिक दुरी चा अंतर ठेवून हा कार्यक्रम करण्यात आला.
close