इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर तालुक्यातील बीडसिंगे येथील राहणारे विष्णु ज्योतीराम अवचर या शेतकऱ्याचा राहत्या घराला अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही .या आगीत घरातील सर्व साहित्य जळून गेले असून सध्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबानी मदत करून आधार दिला.
या आगीत सर्वकाही जळून गेल्याने या कुटुंबाला शासनाच्या आधार बरोबर सामाजिक जाणिवेतून दानशूर लोकांच्या मदतीची गरज आहे हे लक्षात घेऊन काल दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी आमच्या शिर्डी एक्सप्रेस ने दिलेल्या बातमीची दखल घेऊन प्रतिसाद म्हणून भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी अवचर कुटुंबाला गहू ,तांदूळ, साखर व किराणा साहित्य इत्यादी जीवनावश्यक वस्तू दिले आणि त्यांना आधार देण्याचे काम आज केले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की सदर कुटुंबाच्या जळालेल्या वस्तू मध्ये धान्य कपडे पैसे भांडी यांची अवस्था पाहून दानशूर सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांनी या कुटुंबाला मदत करवी असे आवाहन केले .
या कुटुंबास शासनाच्या मदती बरोबर जनतेच्या मदतीची गरज आहे असे ते म्हणाले .यावेळी या कुटुंबाच्या माहितीवरून शासकीय स्तरावरून पंचनामा व्यतिरिक्त कोणतीही मदत झालेली नाही तसेच या कुटुंबाला भेट देण्यासाठी अथवा पाहणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय प्रतिनिधी फिरकले नाहीत तसेच अमोलराजे इंगळे यांनी म्हटले की या कुटुंबाला अजून मदत लागली तरी स्वतः देतो व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून काही मदत मिळवून देण्याचे यावेळी मत व्यक्त केले. या ठिकाणी सदर कुटुंबातील महिला यांनी म्हटले की, माणसाला मदती पेक्षा ,भेटीने जगण्याची उभारी व आधार मिळतो.तो आधार देण्याचे काम आपल्यासारख्या सामाजिक जाणीव असणाऱ्यांनी केले. यावेळी याठिकाणी शिवछावा मावळा संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जाधव ,किरण यादव,सुधिर यादव, प्रविण देवकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.


