बीड । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:-
संतांची भूमी असलेल्या महाराष्टात ठाकरे सरकारने बार सुरू केल्या आणि मंदिरे बंद ठेवले आहेत . या काळ्या निर्णयाच्या विरोधात माजलगाव जुना मोंढा येथे भाजपचे लाक्षणिक उपोषण सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याचा विचार करून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे ठाकरे भाविकांसाठी खुली करावीत सरकारने बार सुरू केल्या आणि मंदिरे बंद ठेवले आहेत .
या काळ्या निर्णयाच्या विरोधात माजलगाव मध्ये जुना मोंढा येथे दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे आणि भाजपचे नेते रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करणयात आले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत, बबनराव सोळंके, माणिक दळवे, हनुमान कदम,विनायक रत्नपारखी, ईश्वर खुरपे, मनोज जगताप, शरद कचरे, अनंत जगताप, मनोज फरके, दिलीप सोळंके, भगीरथ शेजुळ, दत्ता महाजन, नारायण भले, बाळासाहेब क्षिरसागर, पवन मोगरेकर, छबन घाडगे, सुशांत जाधवर, धांनजय काळे, सुभाष कांबळे, मंचक गायकवाड, संतोष वाघमारे यांच्या सह भाजप कार्येकर्ते उपस्थित होते.

