shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील चालु असलेले अवैध धंदे बंद करा;काँग्रेसचे नेते ओमप्रकाश देशमुख यांचे हिंगोली पोलीस अधिक्षकांना निवेदन..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील गावात मटका,तितली भवरा, झन्ना-मन्ना,जुगार यासह अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यामध्ये खास करुन सेनगांव ठाणे हद्दीत अवैध धंदे चालकाने आपल्या गैर अवैध धंद्याचा कळस गाठला असुन त्यास सेनगांव पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यासह पोलीस प्रशासन जबाबदार आहे.चालु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करुन सेनगांव येथील पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून विविध कारणाने पोलीस अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून कायम बस्तान ठेवुन आहेत त्यांची इतर ठिकाणी बदली करावी या मागणीचे निवेदन सेनगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.२३ आक्टोबर शुक्रवार रोजी हिंगोली पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहे. 


सेनगांव तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावात चालु असलेल्या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील युवा तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. व त्यांचे जीवन बरबाद होण्याच्या मार्गावर आहे  तर काही व्यसनाधीन पुरुष मंडळी आपला अवैध शोक पुर्ण करण्यासाठी कुटुंबातील महिला व इतर सदस्या सोबत वाद घालीत आहेत.परीणामी सर्व सामान्याचे जनजीवन असह्य जगण्यासाठी पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे अनेक पिडीत महिलाकडुन आरोप केला जात आहे.विशेष म्हणजे सेनगांव ठाण्यात काहीजन अनेक वर्षापासुन विविध कारणाने पोलीस कर्मचारी ठाण मांडुन कायम बस्तान ठेवुन आहेत.

त्यामुळे अवैध धंदे चालक व पोलीस प्रशासनाची घट्ट मैत्रीचे नाते निर्माण होत आहेत परीणामी अवैध धंदे चालण्यास पोलीस प्रशासनच मदत करीत आहेत.तर सेनगांव पोलीस ठाणेत कुठली ही फिर्याद अथवा तक्रार देण्यास गेले असता त्यास स्थानिक पोलीस प्रशासनाकडुन अपमानास्पद वागणुक दिल्या जाते व पिडीतेस तक्रार दाखल करावयाची असल्यास संबधीत पोलीस प्रशासन अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय कुठली ही तक्रार अथवा फिर्याद दाखल करण्यात येत नाही अशा निष्क्रिय पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो.तरी मा.पोलीस अधिक्षक साहेबांनी तालुक्यातील चालु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करुन सर्व सामान्य नागरिकांना संविधानानुसार जगण्याचा मार्ग मोकळा करावा.तसेच सेनगांव येथील पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना तात्काळ इतर ठिकाणी बदली करावी व आम्ही केलेल्या विधायक मागणीचा तात्काळ विचार करुन दोषी विरूध्द कार्यवाही करावी अन्यथा सेनगांव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात तिव्र आदोंलन छेडण्याच्या इशारा देखील देण्यात आला. 

यावेळी काँग्रेसचे नेते माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख,सेनगांव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य विनायकराव देशमुख,शहराध्यक्ष दिलीप होडबे उपस्थित होते.हे निवेदन मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.पालकमंत्री हिंगोली,विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड व खा.राजीव सातव यांना देण्यात आले आहे.
close