shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान-जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील..!!

इंदापूर :प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
जंक्शन (इंदापूर)
शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी  युवा नेते मा. राजवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते आज रक्तदान शिबिराचे जंक्शन येथे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी जंक्शन ,वालचंदनगर येथील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धनदादा पाटील


 यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. गरजूंना आवश्यक वेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशा वेळी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. अशी वेळ येऊ नये, यासाठी रक्तसाठा आवश्यक असतो. यासाठीच जंक्शन येथे श्री सुरेश भास्कर चौधरी व  त्यांच्या काळेश्वरी मित्रमंडळ आनंदनगर  यांनी रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल राजवर्धन पाटील यांनी त्यांचे  कौतुक करुन  सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या शिबिरात मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टंन्सिग इत्यादी आरोग्यविषयक खबरदारी घेतली गेली आहे.


तरी  युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन राजवर्धन पाटील यांनी  केले.
गेल्या काही महिन्यांपासून जि.प सदस्य अंकिताताई पाटील व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे विविध सामाजिक उपक्रमाव्दारे तसेच अतिवृष्टी असेल किंवा कोरोना काळातही लोकांपर्यंत पोहचून मदतकार्य व धिर देण्याचे काम करत होते यामुळे तालुक्यात या दोन्ही युवकांची चर्चा ही कुतूहलाचा विषय बनला आहे.
close