इंदापूर :प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: २३ ऑक्टो २०२०.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन (NGP4511)चे इंदापूर तालुका अध्यक्ष नामदेव पवार यांनी दिनांक १९/ १०/२०२० रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माळीनगर (ता. माळशिरस)येथे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची किमान वेतन बाबत ग्रामविकास विभागातून मंजूर करून घेण्यासाठी चर्चा केली . तसेच यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांना भविष्य निर्वाह निधी रक्कम खात्यावर जमा करावे .सुधारित किमान वेतन दरानुसार वेतन मिळावे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी इत्यादी मागण्या संदर्भातही चर्चा करून त्यांच्यासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या व व्यथा मांडल्या. याबाबत धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करू असे चर्चेच्या वेळेस म्हटले . अशी माहिती इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली.


