shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप..!!

इंदापूर तालुका प्रतिनिधी

बोराटवाडी (ता.इंदापूर, पुणे)  येथील शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयातील  ५० विद्यार्थिनीना (मुलींना) सायकलचे वाटप माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले .


 बोराटवाडी (ता. इंदापूर )येथील शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते सायकल वाटप करतानां तर दुसऱ्या चित्रांमध्ये विद्यार्थ्यांसोबत सायकल  चालवण्याचा आनंद घेताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (छाया: कैलास पवार)


या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थिनी व त्यांचे पालक हे उपस्थित होते. बोराटवाडी ( ता. इंदापूर ,पुणे ) येथिल शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .

विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ घोगरे सर आपल्या प्रास्ताविक मनोगतात म्हणाले कि,  इंद्राणी बालन फाउंडेशन व दैनिक सकाळ सोशल फाउंडेशन यांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य सायकलीसाठी लाभले असून त्यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

 त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की ,बोराटवाडी , चाकाटी, पिठेवाडी, खोरोची , रेडणी  या ग्रामीण  भागांमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निर्माण करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी व उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी ही संधी निर्माण करुन दिली ती खरोखरचं खूप मोठी आणि मोलाचे आहे. सातवीपर्यंत बोराटवाडी येथे शाळा होती ती आता बारावीपर्यंत शाळा झाली आहे याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना झाला आहे . ग्रामीण भागातून  इंदापूर शहराच्या ठिकाणी जवळपास ३० ते ३५ किलोमीटर सकाळी सात वाजता कॉलेजला किंवा शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं. आता शिक्षणाची गंगा घरापाशी दोन ते अडीच किलोमीटरवर आली . एवढी  मोठी शिक्षणाच्या सुविधा झाल्यामुळे अनेक मुलां व मुलींना शिक्षण घेता येते हे माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार  झाले आहे असे आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी येथे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी  आरोप्लांट बसवला जाईल,  भोजन कक्ष आणि अन्न शिजवण्यासाठी चांगल्या दर्जाचा किचन निर्माण केले जाईल. विद्यालयाला अनेक सुविधासाठी पुढील काळात आपण सुविधा देणार असून सर्व इंदापूर तालुक्यातील शाळा एकत्र जोडणारा असून  कोण कधी आला,  कोण कधी गेला,  काय शिकवले जाते,  विद्यार्थी काय करतात  हे सुद्धा थेट एका ठिकाणी  पाहता येईल आणि ग्रामस्थांना व  विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आपला विद्यार्थी काय करतो हे समजेल अशा सुविधा उपलब्ध करणार असे त्यांनी सांगितले.

 यावेळी दै. सकाळाचे वालचंदनगर  येथील वार्ताहर राजकुमार थोरात, दै.सकाळचे बावडा येथील दिपक शिंदे, माणदेश माझा चैनलचे इंदापूर तालुका प्रतिनिधी इम्तिहाज मुलाणी,  इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष कैलास पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उदयसिंह पाटील  संचालक नि.भी.सह साखर , मनोज पाटील, उपाध्यक्ष श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी,  किरणराव पाटील, सचिव श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, दत्तात्रय सवासे, सरपंच बोराटवाडी, प्रसाद पाटील, संचालक श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा, दयानंद गायकवाड माजी संचालक दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ इंदापूर, स्वप्नील घोगरे संचालक श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कृष्णा बोराडे ,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक  दशरथ घोगरे यांनी केले व सूत्रसंचालन  अमर निलाखे यांनी केले आणि आभार  राजेंद्र रणमोडे व्यक्त केले.




माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यासोबत सायकल चालवण्याचा घेतला आनंद


 बोराटवाडी तालुका इंदापूर येथील शहाजीराव पाटील माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थिनिसोबत माजी मंत्री यांनी स्वतः सायकल चालवून आनंद घेतला .विद्यार्थीनी सुद्धा माजी मंत्र्यांनी आपल्यासोबत सायकल चालवल्याबद्दल खुशीत होते . उपस्थित अनेक जणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये हा आनंदाचा क्षण टिपला.

---------------------------------------------------



close