shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर धनगर समाजाची एसटी आरक्षणासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन...!!

संगमनेर धनगर समाजाची एसटी आरक्षणासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन...!!

संगमनेर:- एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार सेनेतर्फे तळेगाव दिघे येथील तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन. संगमनेर मधील तळेगाव दिघे येथील भवानीमाता परिसरातील जल तलावात मल्हार सेने तर्फे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. 

यावेळी मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने सरकारची लक्ष वेधले.  यावेळी संगमनेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक, आबळे पमार, आश्वी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सुधाकर मांडवकर, संगमनेर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक , पप्पू कादरी , यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शांततेच्या मार्गाने मल्हार सेनेचे एसटी आंदोलन करण्यात आले.

तळेगाव दिघे येथील तलावात हे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी मल्हार सेने ने जोरजोरात घोषणा दिल्या. धनगर आरक्षण मिळाले पाहिजे व धनगराला न्याय मिळाला पाहिजे ,अशा घोषणा करण्यात आल्या. यामध्ये धनगर समाजाने आपली व्यथा मांडली.
व आमच्या मुलांनी एवढे शिक्षण घेतले तरी त्यांना घरीच बसून राहावे लागते. यांना कुठल्याही  सुख-सुविधा नाही. या मायबाप सरकारने तातडीने निर्णय घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा. अन्यथा पुढेही तीव्र आंदोलन उभारले जातील असा इशारा ही यावेळी  देण्यात आला.
close