इंदापूर : प्रतिनिधी
निमगांव केतकी (ता. इंदापर) येथील कोविड सेंटरमधून कोविड रुग्णांच्या उपचाराकरिता देण्याकरीता आणलेल्या या अत्यावश्यक व दुर्मिळ औषध असलेल्या फॅबीफ्लू नावाची गोळी तेथीलच कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांनी चोरुन नेल्या.हे प्रकरणी उघडकीस आल्यावर त्यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतरही दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई का नाही ? असा सवाल करत या दोषींना वाचविणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा प्रतिसवाल बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी आज दि. २२ अॉक्टोंबर रोजी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
न मुक्ती पार्टीच्या वतीने काल दि. २१ रोजी पासून बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग हे या गोळी चोरीप्रकरणातील दोषींवर कारवाई करावी याकरिता आमरण उपोषणास बसले आहेत.
यावेळी बोलताना अॅड.राहुल मखरे यांनी निमगांव-केतकी येथील कोविड सेंटरच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की,निमगांव-केतकी कोविड सेंटर मधील रुग्णांचा मृत्यू दर हा ८ टक्के आहे. हा मृत्यूदर हा सर्वात जास्त असून ही जगातील सर्वात वाईट व गंभीर परिस्थिती या कोविड सेंटरची आहे.
निमगांव केतकी कोविड सेंटरमध्ये दि. १५ अॉक्टोंबर पर्यंत १९० कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले होते. याठिकाणी रुग्णाचा शेवटचा मृत्यू हा दि. १० सप्टेंबर २०२० रोजी झाला आहे.
अश्या स्थितीत या कोविड सेंटरमधून दि. ६ अॉक्टोंबर रोजी फॅबीफ्लू या तेथील कोरोना रुग्णांना देण्याकरिता असलेल्या या गोळ्या चोरीला गेल्याचे येथे काम करणार्या एका परिचारिकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गोळ्या चोरुन नेणाऱ्या संबंधित डॉक्टरांना फोन करुन तेथील रुग्णांची परिस्थिती सांगितली. या गोळ्या रुग्णांना द्यायच्या आहेत. तुम्ही लवकरात लवकर आणून द्या अन्यथा माझी नोकरी जाईल असे त्यांनी संबंधित डॉक्टरांना फोनवरुन सांगितले.
या फोनची अॉडीओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत असल्याने येथील कोविड सेंटरवर घडलेल्या या भयानक प्रकाराची, कोविड रुग्णांच्या जीविताशी खेळलेल्या संबंधित डॉक्टरांवर, त्यांना वाचविणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी, यांची सखोल चौकशी करुन या दोषींच्यावर चोरी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी केली आहे.
आंदोलनकर्ते बाबासाहेब भोंग यांनी निमगाव केतकी येथील कोविड सेंटरच्या कारभाराविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.मरण पावलेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना कसली ही खबरदारी घेण्यात येत नव्हती.निमगाव केतकीच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरावर असणा-या वनपरिक्षेत्रामध्ये अंत्यसंस्कार होत होते.तेथे उरलेले प्रेताचे अवशेष कुत्रे गावात आणत होते असे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना मयत झालेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी निमगाव केतकी येथील कोविड सेंटरमध्ये कसले ही उपचार होत नव्हते असे स्पष्टपणे सांगितले.


